← Back to Events
साभिनय संस्कृत-कथा प्रस्तुती  प्रतियोगिता – २०२६
Event

साभिनय संस्कृत-कथा प्रस्तुती प्रतियोगिता – २०२६

संस्कृत भाषा प्रचारिणी सभा, नागपूर यांच्या वतीने बालकांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे, संस्कृत भाषेविषयी बालमनात प्रेम व जिज्ञासा निर्माण व्हावी आणि संस्कृत साहित्याचा संस्कारक्षम व आनंददायी परिचय नव्या पिढीला व्हावा, या व्यापक हेतूने “ साभिनय संस्कृत-कथा प्रस्तुती प्रतियोगिता – २०२६” ही बुधवार दिनांक ९ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येत आहे. ही केवळ एक स्पर्धा नसून संस्कृतभाषा, भारतीय संस्कृती, संस्कार आणि बालप्रतिभा यांचा सुंदर संगम घडविणारा उपक्रम आहे. संस्कृत भाषा ही भारतीय ज्ञान-विज्ञान-प्रणालीची, साहित्याची, संस्कृतीची आणि संस्कारांची समृद्ध वाहक आहे. बालवयातच संस्कृत भाषेची गोडी निर्माण झाली, तर संस्कृतच्या संवर्धनासाठी एक सक्षम व संस्कारक्षम पिढी घडू शकते. तसेच उच्चार शुद्ध होतात व स्मरणशक्ती वाढवण्यास मदत होते. या दृष्टीने ही प्रतियोगिता महत्त्वपूर्ण असल्याने, चयनित कथेचा आशय सुसंस्कृत, सकारात्मक, प्रेरणादायी आणि बालकांच्या वयोगटास अनुरूप असावा. प्रतियोगितेचे नियम व इतर माहिती सोबत जोडली आहे, त्यानुसार सहभाभी होऊन सहकार्य करावे, ही विनंती, धन्यवाद!
Starts
09 Sep 2026, 03:07 PM
Ends
09 Sep 2026, 03:08 PM
Venue
आकर्षण सभागृह, स्कूल ऑफ स्कॉलर्स , अत्रे ले आऊट , नागपूर
Notice
साभिनयं संस्कृतकथा-प्रस्तुति-स्पर्धा – २०२६
नियमावली
* प्रतियोगितेचा दिनांक , बुधवार , दिनांक 09 सप्टेंबर 2026 ,
* प्रतियोगितेचे स्थळ , आकर्षण सभागृह, स्कूल ऑफ स्कॉलर्स , अत्रे ले आऊट , नागपूर
* वेळ , सकाळी 09.00 ते सायंकाळी 04.00 वाजे पर्यंत
* वयोगट , गट अ – बालगट , वर्ग 5 ते 7 , * गट ब – किशोरगट वर्ग 8 ते 10 दोन्ही वयोगटांसाठी स्वतंत्रपणे कथाकथन स्पर्धा घेण्यात येईल. स्पर्धेच्या दिनांकास असलेले वय ग्राह्य धरले जाईल.
* प्रतियोगितेच्या दोन स्पर्धकांची नावें, वर्ग, गट ही माहिती सोमवार दिनांक ७ सप्टेंबर पर्यंत 8237109055 या गणसंकेतावर व्हाट्सएप मॅसेज ने पाठवावीत. तसेच खालील सभेचा क्यू आर कोड स्कॅन करून प्रतिस्पर्धक शुल्क ₹ ५०/- पाठवावे (किंवा प्रत्यक्ष स्पर्धा स्थानी येतांच जमा करावे). उशीरा आलेली नावें विचारात घेतली जाणार नाहीत व शुल्क वापस (रिफंड) मिळणार नाही.
कथा-प्रस्तुतीची भाषा
१. कथाकथनाचे सादरीकरण संस्कृत भाषेत असणे आवश्यक आहे.
२. संस्कृत भाषेचे उच्चार शक्य तितके शुद्ध व स्पष्ट असावेत.
३. आवश्यकते शिवाय मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेचा वापर टाळावा.
४. भाषेची शुद्धता, सहजता आणि प्रवाहीपणा तसेच कथा प्रस्तुत करतांना अभिनय व देहबोली यांना परीक्षणामध्ये विशेष महत्त्व दिले जाईल.
५. वेळेची मर्यादा दोन्ही गटां साठी 03 ते 04 मिनिटे राहील. निर्धारित वेळेचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. वेळेच्या मर्यादेचे उल्लंघन झाल्यास स्पर्धकाला स्पर्धेतून बाद करण्यात येईल
सादरीकरणा संबंधी नियम:-
१. स्पर्धकाने कथा पाठांतर करून साभिनय सादर करावी.
२. कथा-प्रस्तुतीचे वेळी पुस्तक, वही, कागद, मोबाईल अथवा अन्य लिखित मजकुराचा आधार घेता येणार नाही.
३. कथानुरूप चेहऱ्यावरील भाव, हातवारे आणि देहबोलीचा योग्य वापर करावा.
४. आवाजातील चढ-उतार, योग्य विराम, स्पष्ट उच्चार आणि प्रभावी संवादफेक अपेक्षित आहे.
५. आवश्यक असल्यास कथेला अनुरूप मर्यादित व साध्या वस्तूंचा वापर करता येईल.
६. नेपथ्य उभारता येणार नाही.
७. इतर व्यक्तीने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष (प्रोंप्टिंगने) कथाकथनात मदत करता येणार नाही.
८. ध्वनिमुद्रित संवाद किंवा बाह्य आवाजाचा आधार घेता येणार नाही.
९. कथेमध्ये कोणत्याही समाज, व्यक्ती किंवा समूहाच्या भावना दुखावणारा अथवा आक्षेपार्ह आशय नसावा.
१०. कथानुरूप रंगभूषा व वेशभूषेला विशेष प्राधान्य देण्यात येईल
११. सर्व स्पर्धकांनी सकाळी ८.३० वाजेपर्यंत स्पर्धास्थळी उपस्थित राहून नोंदणी व उपस्थितीची प्रक्रिया पूर्ण करावी. सकारण उशिरा येणाऱ्या स्पर्धकास आयोजक समितीच्या निर्णयानुसार संधी देण्यात येईल.
१२. स्पर्धेचा क्रम :- स्पर्धकांचा क्रम आयोजक समितीमार्फत निश्चित केला जाईल. आवश्यकतेनुसार क्रमांक चिठ्ठीद्वारे किंवा आयोजकांच्या पद्धतीनुसार निश्चित करण्यात येईल.
१३. वयाचा पुरावा :- आवश्यकतेनुसार स्पर्धकाने जन्मतारीख असलेले शाळेचे ओळखपत्र, जन्मदाखला किंवा अन्य अधिकृत वयाचा पुरावा सादर करावा. चुकीची माहिती आढळल्यास स्पर्धकाची नोंदणी रद्द करण्याचा अधिकार आयोजकांना राहील.
१४. परीक्षकांचा निर्णय :- संस्कृत भाषा, साहित्य, शिक्षण व कला क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची परीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात येईल.परीक्षकांचा निर्णय अंतिम व सर्व स्पर्धकांना बंधनकारक राहील. याबाबत कोणताही वाद अथवा आक्षेप ग्राह्य धरला जाणार नाही.
१५. पारितोषिके :- प्रत्येक वयोगटासाठी स्वतंत्रपणे :🏆 प्रथम क्रमांक, 🏆 द्वितीय क्रमांक ,🏆 तृतीय क्रमांक ,🌟 उत्तेजनार्थ पारितोषिक , तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. पारितोषिकांचे स्वरूप व रक्कम आयोजक समिती स्वतंत्रपणे जाहीर करेल.

अंतिम अधिकार :- स्पर्धेच्या आयोजना संदर्भात उद्भवणाऱ्या कोणत्याही बाबतीत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार संस्कृत भाषा प्रचारिणी सभा, नागपूर यांच्या आयोजन समितीकडे राहील.आयोजक समितीस परिस्थितीनुसार नियमांमध्ये आवश्यक बदल, सुधारणा किंवा पूरक सूचना करण्याचा अधिकार राहील.
Open PDF Notice